खासदार क्रिडा महोत्सव नागपुरात बोधी बुडोकान कराटे धामणगावच्या विधार्थीनीचा डंका

 



खुशी प्रवीण जनबंधू ची सिल्वर मेडलला गवसणी 

         

              धामणगाव रेल्वे - सुरज वानखडे 


 खासदार क्रिडा महोत्सव २०२४ खेलो नागपूर खेलो हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपुर येते आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या खेळाचा समावेश असून त्या खेळाममधून स्थानिकसह ग्रामीण खेळाडूंच्या सुप्त कलागुणाना वाव मिळावा आणि त्यांचे कौशल्य सर्वांपुढे यावे या विचारधारातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून खासदार क्रिडा महोत्सव २०२४ नागपूर येथे आयोजन केले आहे. 




              या क्रीडा महोत्सवात बोधी बुडोकान कराटे धामणगाव रेल्वेची कु. खुशी प्रवीण जनबंधू वर्ग ९ ची विद्यार्थिनी हिने १४ वर्षवयोगटातील भाला फेक व थाली फेक मधे द्वितीय क्रमांक पटकावत सिल्वर मेडल ला गवसणी घालून धामणगाव शहराचे नाव रोशन केले आहे. ख़ुशी जनबंधू ने प्राप्त केलेल्या यशाबदल तिचे आईवडील व बोधी बुडोकान कराटे टीम धामणगाव रेल्वे या सर्वांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..

Post a Comment

Previous Post Next Post