मांजरखेड कसबा : जिल्हास्तरीय जिल्हा परिषद कर्मचारी व अधिकारी क्रीडा महोत्सवात चांदूर रेल्वे पंचायत समितीच्या शितल देशमुख व स्नेहल देशमुख यांनी तीनही खेळात प्रथम पारितोषीक पटकावून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आपली विजयी परंपरा कायम राखत चांदूर रेल्वे पंचायत समितीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
दि 11 ते 13 जानेवारी दरम्यान अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या भव्य क्रीडांणावर आयोजित जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात चांदूर रेल्वे पंचायत समितीमधील शीतल देशमुख यांनी बॅडमिंटन सिंगल व कॅरम सिंगल या वैयक्तिक क्रीडा प्रकारात विजय संपादन केला असून बॅडमिंटन दुहेरी या क्रीडाप्रकारात शीतल देशमुख व स्नेहल देशमुख यांनी प्रथम पारितोषीक पटकावले. शीतल देशमुख या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा सावंगा विठोबा येथे तर स्नेहल देशमुख या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घुईखेड येथे सहाय्यक शिक्षीका महणून कार्यरत आहेत. हे विजयी खेळाडू आता विभागीय क्रीडास्पर्धेत अमरावती जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत
बक्षीस समारंभाला उपस्थित जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष जोशी , मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके , गटविकास अधिकारी संजय खारकर, क्रीडा संयोजक डॉ. नितीन उंडे , माया वानखडे गटविकास अधिकारी यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. विजयी खेळाडुंचे संदीप बोडखे गटशिक्षणाधिकारी, रविंद्र दिवाण शिक्षण विस्तार अधिकारी , क्रीडा समन्वयक आशीष उल्हे यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले . विजयी खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक नंदुभाऊ सोरगीवकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.