डॉक्टर प्रा.प्रवीण राऊत व डॉक्टर सागर वाघ यांची उपस्थिती्
चिमुकल्यांच्या नृत्य आणि डान्स ने प्रेक्षक भारावले
मांजरखेड कसबा, राहुल देशमुख
चांदुर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड कसबा येथील चिमुकल्यांचे एक दिवशी स्नेहसंमेलन नुकतेच माजरखेड कसबा लेक्झिकॉन इंग्लिश स्कूलमध्ये संपन्न झाले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात चिमुकल्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.
मांजरखेड कसबा येथील दिनांक 13 जानेवारीला वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन श्रीकृपा हॉस्पिटलच्या संचालक डॉक्टर सागर वाघ डॉक्टर श्रुती वाघ यांनी केले.
पाहुण्याच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर प्रवीण राऊत प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक उमेश ढगे , पर्यवेक्षक पी के सरदार , सरपंचा पल्लवी देशमुख उपसरपंच मोहसीन शेख मुख्याध्यापिका अनिता खडसे माजी मुख्य. प्रणिता देशमुख
हेमंत यावले ,समीर देशमुख, मनोज महाजन सर यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले संत गाडगे महाराज शिवाजी महाराज यांच्या फोटोचे हार घालून पूजन केले.
यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळेस सकाळी दहा ते चार पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळेस श्रीकृपा हॉस्पिटलचे संचालक सागर वाघ यांनी आपल्या दोन शब्दात मोबाईल मुळे होणाऱ्या परिणामांची माहिती पालकासह विद्यार्थ्यांना दिली मोबाईल मुळे आपण आपल्या जुना खेळ विसरत चाललो आहे.
असे ते म्हणाले यावेळेस डॉक्टर प्रवीण राऊत प्राचार्य व मुख्याध्यापक उमेश ढगे सर यावले सर सरदार सर यांनी यावेळेस आपले मनोगत व्यक्त केले दिवसभर चालणारा या कार्यक्रमात लहान मुलांनी प्रेक्षकांचे म्हणजे जिंकली यात लेझीम नृत्य नाटक डान्स नाटिका आधी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रास्ताविक अनिता खडसे यांनी केले यावेळेस कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता महाजन यांनी केले.
आभार संगीता सवाई यांनी केले यावेळेस श्रद्धा देशमुख, अश्विनी भोगे, सरोजा, ढोके प्रवीण कोराटे व शिक्षक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सांगता वंदे मातरम् या गीताने झाली..