जगप्रसिद्ध अजिंठा लेणी च्या पायथ्याशी मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी भरणारी एक दिवसीय यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आहे.
अजिंठा लेणी च्या पायथ्याशी मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी एक दिवशी यात्रा भरते हि यात्रा विना आयोजक व संयोजक विना भरते प्रचार प्रसार नसतांनाही भाविक मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी होतात या यात्रेत भाविक येतात व अजिंठा लेणीला भेट देऊ यात्रेत सह भागि होऊन खरेदी करतात.
मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी व्यापारी हि आपला माल घेऊन येथे दाखल होतात व स्वतःच मोकळी जागा पाहुन आपली दुकाने लावतात यात्रेत महिला व मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात असते.व्यापारीही महिला मुलांना आवडणारे साहित्य अनतात यात्रेत दाळ्या रेवड्याची विक्री मोठ्या प्रमाणात होते या मुळे दाळ्या रेवड्याची यात्रा म्हणून हि प्रशिध आहे.आज मराठवाडा .खानदेश.मध्यप्रदेशात तील भाविक मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले होते मोठ्या उत्साहात ही एक दिवसीय यात्रा आज पार पडली आहे.