डोंबिवली(गुरुनाथ तिरपणकर)-म्युझिक मंत्राच्या संस्थापिका-संचालिका शर्मिला केसरकर या सांस्कृतिक क्षेत्राबरोबर सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत.तसेच त्या सांस्कृतिक विभाग चित्रपट कामगार आघाडीच्या डोंबिवली शहर अध्यक्षा आहेत.शर्मिला केसरकर यांनी गेली१५वर्षे विविध शहरांमध्ये आपला ऑर्केस्ट्रा सादर केलेला आहे.त्याचाच एक भाग म्हणून नुकताच डोंबिवली पुर्व येथील सर्वेश हाॅलमध्ये"यह शाम मस्तानी"हा मराठी-हिंदी गाण्यांचा संगीतमय कार्यक्रम सादर केला.त्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या कार्यक्रमाच्या माध्यमातून अजरामर मराठी-हिंदी गाणी सादर करण्यात आली.या ऑर्केस्ट्रामध्ये राजेंद्र काळे,राजेंद्र घाग,अतुल,संजय,धनंजय,नितीन,विनित,जिलेश,अजय ठाकुर,सुनिल दळवी,गणेश मांजरेकर,रितेश,डी.पाटील,शालिनी,डाॅ.माणिक,डाॅ.मोहना,प्रज्ञा,मीरा,गौरी,आदी गायिकांनी आपल्या सुमधूर आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.तसेच लवु दरेकर,हेमंत साटम,सुरेश लाड,तपासभाई,संतोष साटम या वादकांचेही उत्कृष्ट सहकार्य लाभले.
याप्रसंगी जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर,ग्लोबल मालवणी संस्थेचे अध्यक्ष सचिन आचरेकर,ग्लोबल रक्तदाते विजय पांचाळ,कवी चंद्रकांत परब,सा.क्रांतीनादचे संपादक अजय झरकर,शेअर मार्केट समुपदेशक अभिषेक मुणगेकर,आई नर्सिग ब्युरोचे संचालक सुधीर पवार आदी मान्यवरांचे ऑर्गनाझर शर्मिला केसरकर आणि त्यांच्या सहका-यांनी पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला.या कार्यक्रमात जनजागृती सेवा संस्था ही मिडिया पार्टनर म्हणुन सहभागी झाली होती.या कार्यक्रमास अरविंद सुर्वे यांचे विशेष सहकार्य लाभले.डोंबिवलीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने"यह शाम मस्तानी"हा संगीतमय कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.