पुस्तकावर बोलु काही या विशेष उपक्रमाचे आयोजन

 


 

डोंबिवली(गुरुनाथ तिरपणकर)-पै फ्रेंडस लायब्ररच्या वतीने १९जानेवारी २०२४ते २८जानेवारी २०२४असे सलग दहा दिवस पुस्तक आदान प्रदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.ज्या लेखक व कवींची पुस्तके प्रकाशित झाली असतील त्यांना आपल्या प्रकाशित पुस्तकावर बोलण्याची संधी देण्यात येणार आहे.पुस्तक लिहिण्यामागील भूमिका,प्रमुख संकल्पना,पुस्तकाची वैशिष्ठे या विषयी व्यासपीठावरून स्वतः लेखकाने आपले मनोगत व्यक्त करायचे आहे.ज्या लेखकांना सदर उपक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपल्या प्रकाशित पुस्तकाच्या दोन प्रती,पुस्तकाची माहिती व आपला परिचय,मोबाईल नंबर लिहून दिनांक २२जानेवारी २०२४पूर्वी ६०२,प्रांजली हाईटस,माऊली हाॅटेलच्या समोर,नांदीवली रोड,डोंबिवली(पूर्व),जि.ठाणे येथे पाठवाव्यात.कार्यक्रमाचे स्थळ-पुस्तक आदान प्रदान उपक्रम,सावळाराम क्रीडा संकुल,एम.आय.डी.सी.डोंबिवली(पूर्व).अधिक माहितीसाठी श्री.हेमंत नेहते(डोंबिवली)8779644992व डाॅ.योगेश जोशी 9757077614 यांच्याशी संपर्क साधावा.

Post a Comment

Previous Post Next Post