औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख
धनवट गावातुन जळगाव- औरंगाबाद महामार्गाकडे जाणारा रस्ता २५-१५ योजने अंतर्गत काम होत असुन हे काम अंदाज पत्रका नुसार होत नसल्याने गावकऱ्यांनी काम बंद पाडले. व
अभियंत्याने आश्वासनं देऊन लांबी कमी करून रूंदी वाढवून अंदाज पत्रका नुसार काम करू व गावकऱ्यांनी काम सुरू केले.
मात्र काम अंदाज पत्रकानुसार झाले नाही तर पुन्हा बंद पाडण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
धनवट ता.सोयगाव गावातील मुख्य रस्ता हा जळगाव- छत्रपती संभाजीनगर महामार्गाला जोडला आहे. हा रस्ता २५-१५ योजनेतुन १० लाख रुपये निधी मंजूर करून ३ मीटर रूंद व ११० मिटर लांब सिमेंट असा मंजुर करण्यात आला आहे. हे होत असलेला बांधकाम अंदाज पत्रकानुसार होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
आणि संबंधित ठेकेदार हा ३३ फुट रुंद असलेला रस्ता आजू/बाजूला जागा सोडून व उकिरडे साफ न करता त्यावरचं खडीकरण करून फक्त १० फुट करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
होत असलेले काम गावातील नागरिक
इरफान पठान,उमर पठान,नवाब पठान,आरिफ पठान,अशोक तुपे,इमरान लुकमान,रशीद पठान यांचसह ग्रामस्थ एकत्र येऊन काम बंद पाडले.
काही काळ तणाव निर्माण झाला. ग्रामपंचायत सदस्य इरफान पठाण यांनी ठेकेदार यांच्या वरिष्ठांशी फोनवर बोलने केले तर - काम बंद करके दिखाऔ असा दम दिल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामस्थांनी काही काळ काम बंद पाडल्या वर कामावर असलेले अभियंता दिपक मोघडे यांच्याशी फोनवर बोलने केले व काम अंदाज पत्रकानुसारच होईल व लांबी कमी करून रूंदी वाढवून घेऊ असे आश्वासन दिल्यावर ग्रामस्थांनी काम पून्हा सुरू करु दिले.
मात्र काम अंदाजपत्रका नुसार झाले नाही तर पुन्हा काम बंद पाडू असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
..................................................................
गावचा मुख्य रस्ता हा ३३ फुट असुन ठेकेदार १० च फुट करत आहे.व होत असलेले काम बोगस होत आहे.व अंदाज पत्रक मागितले तर हे देत नाही व च्या वरिष्ठांशी बोलोतर काम बंद करके दिखा अशा धमक्या देत आहे.
काम जर अंदाज पत्रका नुसार झाले नाही तर काम होऊ देणार नाही.व पुन्हा बंद पाडू
इरफान पठाण ,ग्रामपंचायत सदस्य.धनवट