अहमदनगर : सोनाजी बापू बुधवंत माध्यमिक विद्यालय निंबे नांदूर येथे स्वतंत्र भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला त्याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा भारतीय स्टेट बँक शाखा ढोरजळगाव चे मॅनेजर श्री राहूल साठे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामनाथ बडे साहेब [व्हाईस चेअरमन निंबेनांदूर वि.का.स. सोसायटी ] हे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन दिवटे मॅडम यांनी केले.
याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांची भाषणे झाली तसेच व्यासपीठावरील अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी राजाजी बुधवंत [अध्यक्ष,शनैश्वर सामाजिक संस्था ] सुनीता ताई बुधवंत, अभिदादा बुधवंत, विक्रमराव चेके, [ चेअरमन निंबे नांदूर वि.का.स. सोसायटी ] अनिताताई चेके [ सरपंच निंबेनांदूर ] शोभाताई चेके [उपसरपंच ] उदयनाना बुधवंत, गणपतराव बुधवंत साहेब, विठ्ठलराव बुधवंत, दुर्योधन बुधवंत, भागिनाथ तात्या बडे, सोमनाथ पुंडे मेजर . संदीप बडे, अभिजित बुधवंत. राजेंद्र बडे, राजेंद्र दशरथ बडे, सोमीनाथ बडे, पंकज कुटे, अमोल वाघमारे बबनराव ढाकणे, शंकर कोकरे, सोमीनाथ पावले , शंकर टकले , आदिनाथ यादव, शहादेव वाकडे [ पत्रकार ] विद्यालयाचे माजी विद्यार्थी, गावातील सर्व मान्यवर नागरिक मोठया संखेने उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज विद्यालयामध्ये निंबे नांदूर मधील समस्त महिला भगिनींसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सुनीता बुधवंत आणि दिवटे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी निंबे नांदूर आणि परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रम संपल्यानंतर सर्व विद्यार्थी आणि सर्व निमंत्रितासाठी अल्पोपहार देण्यात आला. एकंदरीत प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.