अहमदनगर : राज्य सरकारने मराठा कुणबी आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत तसे अध्यादेश शिंदे सरकारने काढले आहेत.कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसह सगे सोयरे बाबतीत अध्यादेश काढण्यात आल्याने मनोजजी जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्याला यश आले आहे.
या लढ्याचे सेनापती मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व जल्लोष साजरा करण्यासाठी बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथील ग्रामस्थांनी अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गा वरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे पाटील यांचे भव्य बॅनर लावत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत श्रीफळ फोडुन लैझिम पथकासह ढोलताशांच्या गजरात आदल्या वाजवत फटाक्यांच्या लढीची उधळण करत दिवाळी साजरी केली.यावेळी ग्रामस्थांनी या आरक्षण लढ्याला सहकार्य केलेल्या सर्व जाती धर्मातील बांधवांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली.