अहमदनगर :आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेवगाव येथे आज देशाचा ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला . यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ . नीरज लांडे ,प्रमुख अतिथी विनोद ठाणगे, ह.भ.प.गणेश महाराज डोंगरे,मेजर गोविंद भागाची वाजे,विद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते, प्रभारी उपप्राचार्य अशोक तमनर,उपमुख्यध्यापिका सौ.मंदाकिनी भालसिंग,उपमुख्याध्यापिका पुष्पलता गरुड ,पर्यवेक्षक सुनील आव्हाड, हरिश्चंद्र मडके, शिवाजी पोटभरे,कॅनरा बँकेचे मॅनेजर सतीश इरोळे आदि मान्यवर उपस्थित होते
यावेळी ध्वजाला सलामी दिल्यानंतर इयत्ता ५वी ते १२वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी तालबद्ध सामूहिक कवायत संचलन केले तसेच स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायत संचलन करून ध्वजाला सलामी दिली.यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य, मानवी मनोरे ,मल्लखांब,रोपमल्लखांब, याचे उत्कृष्ट सादरीकरण केले .कॅनरा बँकेच्या वतीने यावेळी विद्यार्थ्यांना विद्यालक्ष्मी स्कॉलरशिप देण्यात आली .
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ . नीरज लांडे यांनी सर्व उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या . त्यांनी विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटना निर्मितीच्या इतिहासाची माहिती दिली .भारतीय संविधान हे जगातील एक आदर्श असे संविधान आहे. राज्यघटनेने दिलेल्या हक्काबरोबरच कर्तव्याची देखील सर्वांनी जाणीव ठेवावी म्हणजे जागतिक पातळीवर आपल्या देशाचा नावलौकिक वाढेल असा त्यांनी उपस्थितांना संदेश दिला .
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ह.भ.प.गणेश महाराज डोंगरे यांच्या वतीने यावेळी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्ञानेश्वर गरड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.