अहमदनगर : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बालमटाकळी शाळेत शिक्षण घेऊन पुणे या ठिकाणी स्थायिक झालेले आदरणीय रावसाहेब मामा सपकाळ व ताराचंद देवराव हे शाळेत आले. शाळेत झालेले बदल पाहून आपल्या बालपणातील शाळेत रममान झाले. मुलाशी संवाद साधत आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
ताराचंद देवराव यांच्या सातवी पास झालेल्या बॅच चा निकाल 1962या वर्षी 100टक्के निकाल लागला होता. त्यावेळी त्यांना मिळालेली ढाल पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. यावेळी दोघांनाही भावना अनावर झाल्या. म्हणूनच म्हणतात गावची शाळा व गावची माती यांच्याशी जोडलेली नाती हृदयात कायमची कोरली जातात. दोघांनीही मुलांना खाऊसाठी 2000रू. दिले .प्रजासत्तक दिनी तालुकास्तरीय विविध गुण दर्शन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या शाळेतील अथर्व देशमुख, अंकिता मस्के, श्रावणी हिवाळे यांचा शाळेच्या वतीने ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.
शाळेच्या मुख्याध्यापिका कवडे मॅडम यांनी सर्व मुलांचे कौतुक केले. पोटभरे सर व शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांचे व प्रमुख पाहुण्यांचे हस्ते मुलांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रम प्रसंगी व्यंकटेश मल्टीस्टेट चे संस्थापक आदरणीय आभीनाथ शिंदे सर, गावचे तलाठी अंधारे भाऊसाहेब, गावचे भूषण व मुंबई पोलिस दलात काम केलेले आमचे मित्र संतोष परदेशी, पत्रकार विजय लेंडाळ तसेच गावचे सरपंच डॉ. राम बामदळे, रामनाथ दादा राजपुरे, विठ्ठल देशमुख, कासम मामा,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण बैरागी यांनी केले. आभार प्रदर्शन जयराम देवढे यांनी केले.