स्कूल ऑफ स्कॉलर्स कब्स व प्रायमरीमध्ये राष्ट्रीय युवा दिवस व राष्ट्र माता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी

 




धामणगाव रेल्वे - सुरज वानखडे 

 

श्री दत्ताजी मेघे बालकल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स कब्स व प्रायमरी येथे स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिवस म्हणून आणि राष्ट्रमाता जिजामाता यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात मा जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका के साई नीरजा व पर्यवेक्षिका शबाना खान उपस्थित होत्या. कार्यक्रमानिमित्त ब्ल्यू हाऊस ने खास परिपाठाचे आयोजन केले. तसेच नृत्य शिक्षक सचिन उईके यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ग सहावीच्या विद्यार्थ्यांनीस्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित सुंदर व अप्रतिम असे नृत्य सादर केले. स्वामी विवेकानंद व जिजामाता यांच्या विषयीमाहिती मुलांना वर्षा देशमुख यांनी दिली .स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषेत रुद्रांग देवघरे व जिजामाता यांच्या वेशभूषेत शाश्वती इंगळे व बरेच विद्यार्थी आले होते.

इयत्ता सहावीचा विद्यार्थी युगराज भैसे, सानिध्य नागपुरे व विद्यार्थीनी श्रेष्टि डाफे यांनी स्वामी विवेकानंद व जिजाबाई यांच्या जीवनावर आधारित सुंदर भाषण दिले. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका के साई नीरजा, पर्यवेक्षिका शबाना खान, आयोजन समिती आणि ब्लू हाऊस सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले . सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि कार्यक्रम यशस्वी केला.

Post a Comment

Previous Post Next Post