धामणगाव रेल्वे - सुरज वानखडे
दि. १३ जानेवारी २४ रोजी संघटीत युवा पत्रकार संघतर्फे धामणगाव शहरातील आरोही रिसॉर्ट येथे सेवाभावी मान्यवरांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध क्षेत्रातील ५० सेवाभावी मान्यवरांचा पुष्पगुछ सन्मानपत्र व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये मुख्यतः सामाजिक, वैधकीय, पत्रकार, सेवानिवृत्त शिक्षक, गौसेवक, माजी सैनिक, सर्पमित्र, पोलीस प्रशासन, संपादक, हाथ फाउंडेशन, कर्मयोगी फाउंडेशन, समाजसेवक, वसा फाउंडेशन सह इतर क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग होता.
सदरच्या सत्कार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रताप अडसड, डॉ.सुनिता बच्छाव प्राध्यापक साएम्बोसिस लॉ. स्कुल, हैद्राबाद, गिरीशोम वाकोली, बी.टेक, केनिया, मंगरूळ दस्तगीर चे ठाणेदार पंकज दाभाडे, दत्तापूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार हेमंत ठाकरे, संजय सायरे अध्यक्ष संघटित युवा पत्रकार संघ हे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून हारार्पण करण्यात आले. त्यानंतर सेवाभावी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांनी संघटित युवा पत्रकार संघाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाला उत्स्फुर्दपणे प्रतिसाद देऊन आभार व्यक्त केले.
संघटित युवा पत्रकार संघातर्फे सेवाभावी मान्यवरांचा सत्कार म्हणजे " न भूतो न भविष्यती " - कमल छांगाणी - जेष्ठ पत्रकार
मी जवळपास ३० वर्षांपासून पत्रकार क्षेत्रात असून आमच्याकडून सुद्दा असा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्याचा संकल्प आमच्या मनात आला नाही परंतु आमचे संघटित युवा पत्रकार संघाच्या वतीने आज घेण्यात आलेला भव्य दिव्य सत्कार समारोह उल्लेखनीय असून "न भूतो न भविष्यती " आहे त्याकरिता आमच्या लहान बंधू संघटित युवा पत्रकार संघाचे सर्वच सदस्याचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार कमल छांगाणी यांनी केले. तर विविध क्षेत्रातील मान्यवरांना एकत्रित आणून त्याच्या कार्याची दखल घेत खऱ्याअर्थाने सन्मानास पात्र असलेल्या मान्यवरांचा सत्कार संघटित युवा पत्रकार संघातर्फे केल्याने सर्वत्र संघटनेचे कौतुक केल्या जात आहे.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन चेतन कोठारी, आभार प्रदर्शन सचिन मुन यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संघटित युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय सायरे, उपाध्यक्ष संतोष वाघमारे, सचिव पवन बहाळ, महासचिव सचिन ठाकूर, कोषाध्यक्ष सुरज वानखडे, सदस्य हितेश गोरिया, सचिन मुन, अनिल शर्मा, सुनील पाटील, अरुण डोंगरदिवे, सलमान खान, गजानन फिरके, शशांक चौधरी, महेंद्र काळे यांनी अधिक मेहनत घेतली..
गावाकडची बातमी साठी आजचं आमच्या प्रतिनिधीशी संपर्क साधा..
मुख्य संपादक देवेंद्र भोंडे