पोलीस उदय दिन सप्ताह निमित्त ग्रामिण पोलीस स्टेशनचा सामाजिक उपक्रम
Vidarbha Editor Milind Jamnik
मूर्तिजापूर - कोरोना काळापासून अति महत्व प्राप्त झालेल्या आणि रक्त साठ्यात होत असलेला नेहमीचा तुटवडा ही बाब लक्षात घेऊन समाजाचा एक घटक म्हणून आणि शासनाचा संरक्षक प्रतिनिधी म्हणून समाजाला काही तरी देणं लागतं या उदात्त हेतूने ग्रामीण पोलिसांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
पोलीस उदय दिन सप्ताह व पत्रकार दिनाचे औचित्य साधून मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये स्वतः ठाणेदार सुरेंद्र राऊत यांनी रक्तदान करून रीतसर शिबिराला सुरुवात करण्यात आलीरक्तदान हे पवित्र कार्य असून यामुळे अनेकांचे प्राण वाचून त्यांना जीवनदान मिळू शकते. यासाठी अशा शिबिराच्या माध्यमातून विशेषतः तरुणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन मूर्तिजापूर ग्रामीणचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांनी यावेळी केले. सदर रक्तदान शिबिरामध्ये पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तसेच पो.स्टे. हद्दीतील नागरिकांनी व पत्रकारांनी रक्तदान केले. सदर रक्तदानाकरिता जिल्हा स्त्री रूग्णालय अकोला रक्तपेढीच्या चमूने सहकार्य केले. रक्तदान शिबिरात रक्तदान करणारे सर्व रक्तदाते, रक्तपेढी चमू व सहकार्य करणाऱ्यांचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांनी आभार मानले.