धामणगाव रेल्वे - सुरज वानखडे
खऱ्या अर्थ्याने विद्धेची माता, स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका, ज्यांनी महिलांना शिकविण्यासाठी इतरांनी त्यांच्या अंगावर मारलेले शेणाचे आणि दगडाचे तुकडे सुद्दा सहन केले. परंतु महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले. ज्यांच्या प्रयत्नामुळे आज देशाच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांचे वर्चस्व आपल्याला दिसून येते त्या म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या आनंदाने आज सर्वच स्तरावर साजरी केली जात असून जुना धामणगावात येथील वार्ड क्र. ५ येथे सुद्धा माता क्रांतीज्योती स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली आहे.
सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन वॉर्ड. ५ येथील नवयुवकाने केले असून कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी मुख्याध्यापक महल्ले सर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अशोक तायडे, अरुण विंचूरकर, सुरेश चौधरी यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन करून हारार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणाले सर यांनी स्त्री शिक्षणाविषयी महिलांच्या जीवनातील सावित्रीबाई फुले यांचे महत्व अतिशय साध्या आणि सोप्यापद्धतीने उपस्थितीतांना आपल्या भाषणातून सांगितले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिलांचे व पुरुषांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे संचालन सुभाष बोरकर यांनी केले..