धामणगांव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर आज गुरुवार रोजी माजी आमदार विरेंद्र जगताप व सभापती कविता श्रीकांत गावंडे यांच्या हस्ते नविन हंगामातील तुर खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी परसोडी येथील शेतकरी सुमीत गावंडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तर तुरीला ९१००/- रुपये दर प्राप्त झाला.
दि.४ जानेवारी २०२४ गुरुवार रोजी स्थानिक कृषि उत्पन्न बाजार समिती धामणगांव रेल्वे येथे नविन तुर खरेदीचा शुभारंभ झाला.
यावेळी मुहुर्तावर सुमी गावंडे यांच्या तुरीला ९१००/- रु. भाव प्राप्त झाले मे.माधव ट्रेडर्स यांच्या अडतमध्ये असलेल्या खरेदीदार मनिष केला यांच्या खरेदीमध्ये हा शुभारंभ करण्यात आला. तर दुसरे शेतकरी विजय गुडदे आडते संतोष लाहोटी खरेदीदार मनिष केला यांनीच खरेदी केली. तर तिसरे शेतकरी अनिल धांदे आडते नंदु राठी खरेदीदार संजय अग्रवाल यांनी खरेदी केली.
यावेळी उपस्थित सभापती कविता श्रीकांत गावंडे, उपसभापती मंगेश बोबडे, संचालक चंदाताई रा. निस्ताने, प्रमोद रोंघे, विपीन ठाकरे, रवि भुतडा, सचिन सोमोसे, संदीप दावेदार, मेघा प्र.सबाने, संगीता सं. गाडे, दिनेश जगताप, देवराव बमनोटे, मुकुंद माहोरे, विलास भिल, प्रशांत हुडे, राधेश्याम चांडक, गिरीष भुतडा, सुनील ठाकरे उपस्थित होते.
तसेच नितिन कनोजिया, रामदासजी निस्ताने, रविभाऊ बिरे, पंकज वानखडे, राजुभाऊ गंगण, देवरावजी कापसे, मोहन घुसळीकर, नितीन देशमुख, सुनील भोगे, सत्यनारायणजी लोया, प्रशांत वानखडे, लक्ष्मीनारायणजी चांडक, मुकेश राठी प्रविण राठी, नितीन दगडकर, प्रशांत वानखडे, सचिन घारपळकर, तसेच व्यापारी संजय अग्रवाल, आबुभाऊ अग्रवाल, प्रदिप कुचेरीया, जितु पनपालिया, राजेश गंगण मधुरजी राठी, कैलास राठी तसेच समितीचे कर्मचारी सचिव प्रविण वानखडे, यार्ड इंचार्ज संजय तुपसुंदरे, दिनेश गोमासे, राजेश तायडे, दिलीप पाटील, नितीन मांडवगणे, भुषण जुमडे, नाना गाडेकर सव कर्मचारी उपस्थित होते.