समता बुद्ध विहारात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी..

 




क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर निबंध स्पर्धेचे आयोजन


धामणगाव रेल्वे: सचिन मून


स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती सावळा येथील समता बुद्ध विहार येथे आज मोठया उत्साहाने साजरी करण्यात आली. याप्रसंगी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या निबंध स्पर्धेत दीपरत्न राऊत, पियूष चीमुरकर, आयुष चिमुरकर, मोहित भगत, प्रतीक भगत, प्रितम मानके, यश उमरे, प्रणय भगत, सानिध्य पूनवटकर या मुलांनी सहभाग घेतला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जिवनचरित्र कार्यक्रमाच्या माध्यमातून जनसामान्यासमक्ष उपस्थितांनी भाषण केले.  

सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, व राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. समता बुद्ध विहार सावळा येथील उपाध्यक्ष रत्नशिल मानके यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले असून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे संचालन राजू राऊत यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सतीश ठोंबरे यांनी केले या कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून विनोद मून, संघरक्षित पूनवटकर, भूषण पाटील, प्रमोद मून, सचिन चिमूरकर, अनिल खडतकर, पुष्पाताई पाटील, लिलाबाई मून, भगत ताई, चरणदास पाटील, व सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post