मुंबई प्रतिनिधी : ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ या परिसरातले अनधिकृत ऑनलाईन लॉटरीचे अड्डे हे ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची नियुक्ती होताच पोलिसांनी उध्वस्त केले आहे या कडक कारवाईबद्दल स्थानिक जनता पोलिसांचे अभिनंदन करीत आहेत.
ठाणे जिल्ह्यातील परिसरातल्या अनेक मोक्याच्या ठिकाणी लॉटरीचे दलाल आणि गुंड यांनी अनधिकृत ऑनलाईन लॉटरीचे अड्डे खुलेआम चालवित होते त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न रहिवाशांपुढे उभा ठाकला होता दक्ष रहिवाशांनी त्या विरोधात अनेकदा तक्रारी करून पोलिस आणि शासनाचे लक्षही वेधले होते कोट्यावधी रुपयांची बनवाबनवी तसेच दादागिरी यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण उभे राहिले पण नवे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पदभार सांभाळताच या गुंड टोळ्यांविरुदध कारवाईचा बडगा उगारला आणि हे वाढत चाललेले अड्डे भुईसपाट केले.
उल्हासनगरचा मटका किंग संदीप गायकवाड डोंबिवलीचा दलाल जुगार माफिया ललित पटेल, मारुती हरड, कार्तिक तावडे, प्रविण मुंडे यासह अनेक टोळ्या ह्या ऑनलाईन बेकायदा लॉटरी चालवित होते सार्यांना गजाआड करून पोलिसांनी कडक कारवाईचे पाउले उचलली आहेत अधिकृत असल्याचा बनाव करून गोरगरीबांची सूरू असलेली फसवणूक त्यामुळे थांबली आहे. या कारवाईमुळे स्थानिक रहिवाशांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.