विदर्भ संपादक मिलिंद जामनिक
मूर्तिजापूर - येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याजवळ पूर्णा कृती समितीच्या वतीने भीमा कोरेगाव च्या विजयस्तंभ प्रतिमा व ५०० शूरवीरांना मानवंदना देण्यात आली.
यावेळी पूर्णकृती पुतळा समितीचे सचिव भैय्यासाहेब तायडे व कार्यक्रमाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनील सरदार होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष द्वारका प्रसाद दुबे व कोषाध्यक्ष रामेश्वर जामनिक व वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष तसावर खान व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता कश्यप जगताप ज्येष्ठ काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष गणीभाई अजमेरे व विचारवंत डॉ चिंतामणजी कांबळे तसेच संजय झारोडीया ,गौतम कांबळे दीपक खंडारे ,प्रा.गोवर्धन इंगोले,रवींद्र गवई ,बाळासाहेब खांडेकर ,रामेश्वर धंदर, अंबेचरण नानीर,प्रवीण फुले, समाधान इंगळे व शहरातील सर्व नगरामधून विजयस्तंभाच्या प्रतिमा घेऊन रॅली काढण्यात आली यावेळी मान्यवर उपस्थित होते.