भीम रत्न युवा प्रतिष्ठान धामणगाव रेल्वेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
धामणगाव रेल्वे - सुरज वानखडे
१ जानेवारी हा दिवस मोठ्या प्रमाणात शौर्य दिन म्ह्णून साजरा करण्यात येतो. त्याचे कारण असे कि, १ जानेवारी १८१८ ला अवघ्या ५०० शूरवीरांनी २८ हजार पेशव्यांना यमसदनी पाठवून इतिहास घडविला. त्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी तसेच त्या ५०० शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी जातात. १ जानेवारी १८१८
या दिनाला स्मरण करून ऐतिहासिक क्रांती दीन म्हणून भीमा कोरेगाव विजय स्तंभाला मानवंदना देण्यात येते.
सर्वसामान्य अनुयायांना भीमा कोरेगाव जाणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी शौर्य विजयस्तंभाची प्रतिकृती निर्माण करून ठिकठिकाणी त्यांना मानवंदना देण्यात येते अशातच धामणगाव रेल्वे येथे सुद्धा भिमरत्न युवा प्रतिष्ठान च्या वतीने शौर्य विजयस्तंभाची प्रतिकृती साकारण्यात आली, तसेच स्मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये दत्तापूर बुद्ध विहार ते नगरपरिषद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत स्मशाल रॅली काढण्यात आली असून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने भीम अनुयायांनी सह्कार्य केले. तसेच समता सैनिक दल धामणगाव रेल्वे च्या वतीने मानवंदना देण्यात आली, त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आले व बुद्ध वंदना घेण्यात आली.
सदरच्या स्मशाल रॅलीमध्ये मानवता बुद्ध विहार, न्यु सिध्दार्थ पंचशील बुद्ध विहार, दत्तापुर
धम्मदोय बुद्ध विहार, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर धामणगाव रेल्वे येथील समस्त भीम अनुयायी संख्येने उपस्थित होते.