बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा समारोपीय कार्यक्रम संपन्न : हजारोंच्या संख्येने उपासक व उपासिका यांची उपस्थिती.

 




मूर्तिजापूर - तालुक्यातीलग्राम पोही येथे वर्षावासापासून सुरू असलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला.

    या धम्मग्रंथ पठनाचा सांगता सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोही येथील सरपंचा दीक्षा किशोर नाईक ह्या होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद देंडवे, मिलिंद इंगळे, संगीता आढाव, मायाताई नाईक, रिजवाना परवीन शेख मुख्तार, योगिता ताई रोकडे, आम्रपाली खंडारे, आम्रपाली तायडे, डी एस ननीर, सुनील भाऊ तामखाने,, संजय नाईक, सुनील सरदार, संजय रौंदळे, जी एन डोंगरे, किशोर नाईक, इत्यादी मान्यवरांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.




कार्यक्रमात आदर्श यांना त्रिवार वंदन करून त्रिशरण पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर नाईक यांनी करून उपस्थित मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केली. त्यात शेख मुख्तार, मोहन रोकडे, सुनील सरदार, प्रतिभा अवचार, डी एस ननीर, यांनी धम्म विषयक सामाजिक दृष्ट्या संघटनात्मक मोलाचे मनोगत व्यक्त केले. मिलिंद इंगळे व प्रमोद देंडवे यांनी आपल्या मनोगत आतून आजची राजकीय स्थिती लक्षात घेता, उपस्थितांना उद्देशून स जगता बाळगून योग्य दिशादर्शक मुलाचे आणि महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.



कार्यक्रमाला मुर्तीजापुर तालुक्यातील पदाधिकारी व आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील उपासक उपासिका कार्यकर्ते तसेच प्रत्येक गावातील बहुसंख्या लोक काही सरपंच माजी सरपंच आणि पंचक्रोशीतील बौद्ध उपासक उपाशी का आणि मंडळींची अधिक प्रमाणात उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच किशोर नाईक यांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post