आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्य़क्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला आहे. या निकालात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण ठाकरे गटाची घटना राहुल नार्वेंकर यांनी नियमबाह्य ठरवली आहे. तर शिंदेंची गटाची घटना ग्राह्य धरली आहे. त्यामुळे ठाकरेंना हा जोरदार झटका बसला आहे. आमदार अपात्रतेच्या या निकालावर आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा निकाल अपेक्षित होता आणि यापेक्षा निर्लज्ज लोकशाहीची हत्या होऊच शकत नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरे माध्यमांशी बोलत होते. यावेशी निकालावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुळ राजकीय पक्ष हा आपल्या अध्यक्षांनी त्यांना ट्रायब्युनल म्हणून दिला, त्यामुळे यापेक्षा निर्लज्ज लोकशाहीची हत्या होऊच शकत नाही,असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. तसेच देशासाठी हे मोठे संकेत आहेत. कारण 2024 मध्ये जर गद्दारी अशी लेजीटीमाईज झाली, घाणेरडे राजकारण लेजीटीमाईज झाले. आपलं सविधान भाजपला बदलायचंय. बाबासाहेब आंबेडकरांच संविधान त्यांना मान्य नाही आणि स्वत:च सविधान लिहायच हे या निकालावरून स्पष्ट होत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.