१) खोमनाळ रोड ताड डिपी ६५ असून त्यावर विद्युत भार ११५ चा दिलेल्या आहे. त्यामुळे डिपी नादुस्त झाला. त्यामुळे शेतकाऱ्यांचे पिकाचे नुकासान भरपाई मिळने बाबत. सदर विद्युत भार मंजुर करण्याऱ्या लोकसेवकांवर कायदेशीर कारवाई होणे बाबत.
२) खोमनाळ रोड वरील डिबीएल कंपनीसाठी एच.टी लाईनचे पोल विद्युत निरिक्षक सोलापूर यांची पंरवागी न घेता चालु करून दिले आहे.जे एच.टी पोल ज्या
शेतकऱ्यांचे शेतातुन गेले आहे. त्यांचे ना हरकत न घेता एच.टी पोल उभे केले आहे सदर पोल तत्काळ काढण्यात यावे व संबधित ठेकेदार व अभियंता यांच्यावर
गुन्हा दाखल होणे बाबत मागणी..
३) मंगळवेढा उपकेंद्रातील पाच एम व्ही ए पावर ट्रन्सफॉवर संबिधीत लोक सेवक यांच्या आक्षम्य दुर्लक्षामुळे नादुरुस्त होऊन महाराष्ट्र सरकारचे तसेच वीज ग्राहकांचे नुकसान झाले ही नुकासान भरपाई वीजग्राहकांना मिळण्यात यावी.
४) क्र.मु.अ. (दे.व.म.)/३१५०८ दि.१०/१२/२०२२ नुसार कृषी ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित न करणे बाबत हे पत्र सर्व विद्युत मंडळ्यांना मिळालेले असून
देखील बळजबरीने कृषी ग्राहंकाकदुन वसुली केलेले आहे. सदर लोकसेवकांवर विभागीय चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी.
M.C.E.B च्या कारभारा विरोधात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आमरण उपोषण त्यांना पाठिंबा देण्यासाठी सोलापूर जिल्हा अध्यक्ष योगेश सुळे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी पवार व पंढरपूर तालुका प्रमुख हनुमंत पाटलू कौलगे पाटील व मंगळवेढा तालुका प्रमुख आण्णासाहेब पाटील व गवळी उपस्थित होते..