मुर्तिजापूर बार असोशिएशनसाठी निवडणुक पद्धतीने बलेट चा वापर करून सर्व विधीज्ञ यांनी आपल्या लोकशाही पद्धतीने मिळालेला मतदनाचा वापर करून अध्यक्ष व सचिव पदासाठी उभे असणारे विधीज्ञ यांची निवड केली. ज्यामध्ये अध्यक्ष पदासाठी उभे असणाऱ्या दोन्ही उमेदवार ॲड. भुषण मुळे, व ॲड. सचिन वानखडे,यांना समान मते मिळाल्यामुळे ईश्वर चीठी द्वारे निर्णय घेण्यात आला ज्यामध्ये दोन्ही उमेदवारांनी 6 महिन्याचा कालावधी वाटून घेतला ज्यामध्ये अध्यक्ष म्हणुन ॲड. सचिन वानखडे तर सचिव पदी ॲड. राधिका काळे यांची निवड करण्यात आली.
त्यानिमित्ताने सर्व विधीज्ञ यांनी निकाला नंतर आपला जल्लोष साजरा केला. त्यामध्ये उपस्थित ज्येष्ठ विधीज्ञ राजेश हजारी, सुनिल कांबे,डी.एल .देशमुख , सी.एस देशमुख ,माटे ,प्रशांत भडांगे,आर.आर. महल्ले ,विठ्ठल गौरखेडे ,पि.पि पाटील, सौ. श्रद्धा हजारे , शरद मेहरे, टि.एम. यदवर , आर. एस. वानखडे,जी.पि.वानखडे, श्रीकृष्ण तायडे, मुजमिल हुसेन,संतोष ठाकरे, कपिल अनभोरे, जगननाथ गुल्हाने, इजहार अली ,कुंदन वानखडे, निलेश सुखसोहले, निलेश सुसतकर, के.जे. त्रिपाठी आदी उपस्थित होते.