श्री शिवाजी विद्यालय शहर शाखेत राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती

 




 अकोला :स्थानिक हरिहरपेठ श्री शिवाजी विद्यालय शहर शाखेत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज देशमुख हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून समाजसेविका श्रीमती. परमजित कौर ह्या उपस्थित होत्या.त्यांनी स्वनिधीतून ५० गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.

सर्व प्रथम पाहुण्यांच्या हस्ते डॉ. भाऊसाहेब देशमुख, राष्ट्रमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले.




यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन व कार्यावर विद्यार्थ्यांची समायोजित भाषणे झाली. शिक्षक प्रतिनिधी तायडे व मुख्याध्यापक  मनोज देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 कार्यक्रमाचे संचालन प्रतिभा कराळे यांनी केले तर आभार प्रदर्शन पंकज देशमुख यांनी केले. कार्यक्रमाक्रमाला रामकृष्ण डोंगरे,संपादक युग बदल,शिक्षक प्रतिनिधी किशोर तायडे, विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. 


Post a Comment

Previous Post Next Post