बदलापूर येथे ओएनजीसी ऑफिसर्स महिला समिती बांद्रा यांच्या तर्फे दिव्यांग बाधवांसाठी व्हीलचेअर चे वाटप...

 






                   प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर

बदलापूर: दिव्यांग बांधवांच्या व्यथा,वेदना व गरज याचा विचार करून त्यांना सहानभूती नाही तर सहकार्य करणे महत्वाचे आहे ही भावना व सामाजिक बांधिलकी जपत बदलापूर येथे ओएनजीसी ऑफिसर्स महिला समिती बांद्रा यांच्या तर्फे दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर चे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन स्नेह फाउंडेशन व आदर्श सिद्धांत वेल्फेअर फाउंडेशन या दोन सामाजिक संस्थांमार्फत करण्यात आले होते.सदर कार्यक्रमासाठी ओएनजीसी ऑफिसर्स महिला समितीच्या सेक्रेटरी सौ.किरण सिंह,सोशल इन्चार्ज सौ.रश्मी इनामदार,कल्चरल इन्चार्ज सौ.गीता शेखर,स्नेह फाउंडेशनच्या अध्यशा डॉ.स्नेहा कदम,सामाजिक कार्यकर्त्या सौ.निलिमा पाटील तसेच आदर्श सिद्धांत वेल्फेअर फाउंडेशनच्या संचालिका श्रीमंती दिक्षा शैलेश सोनावणे उपस्थित होते.आमच्या प्रतिनिधींनी दूरध्वनी द्वारे आदर्श सिद्धांत वेल्फेअर फाउंडेशनच्या संचालिका श्रीमती दिक्षा शैलेश सोनावणे यांच्याशी संपर्क साधला असता आपल्या अंतर मनाला जागृत करून आयुष्यात यशाची शिखरे सहज पार करता येतात. आयुष्यात आलेल्या अंधाराला न डगमगता आपण पुढे जायला हवं.मोठी स्वप्नं पाहून यशस्वी व्हायला हवं अशी भावना दिव्यांग बाधवां प्रती व्यक्त केली.सदर कार्यक्रमाचे छायाचित्रीकरण शैलेश विवेकानंद सोनावणे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या पाहुण्यांचा तुळशीची रोपे भेट देवून सामाजिक कार्यकर्ते अनिल चाळके यांच्या कडून सन्मान करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post