मूर्तिजापूर - येथील जुन्या कॉटन मार्केटच्या सभागृहात शेतकरी संघटनेच्या बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटना मुर्तीजापुर तालुक्याच्या वतीने आयोजित सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक आज जुना कॉटन मार्केट सभागृहात पार पडली या बैठकीला तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सोयाबीन वर आलेल्या येलोमोझॅक संदर्भात तसेच नोव्हेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टी च्या मदती संदर्भात चर्चा झाली त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा झाली व पुढील आंदोलनाची दिशा कशा प्रकारे ठरवायची यावरही चर्चा झाली काहीच दिवसात तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना समस्त शेतकरी व शेतमजूर सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन एक मोठा आक्रोश आंदोलन तालुक्यात करणार असल्याचे असे नियोजन झाले आहे.
यावेळी तालुका अध्यक्ष मो.शहाबुद्दीन , युवक तालुकाध्यक्ष योगेश हरणे, शुभम जंवजाळ ,स्वा शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष नितिन गावंडे यांच्या सह तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.