गावाकडची बातमी/जिल्हा प्रतिनिधी, सादिक शेख
फर्दापूर.दि.११(हिट अँन रन कायदा विरोधात फर्दापूर येथे जळगाव औरंगाबाद महामार्गावर
जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करून कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे.
केंद्र सरकारने हिट अँन रन कायदा पारित केला आहे.हा कायदा रद्द करण्यात यावा.या मागणीसाठी आज फर्दापूर येथील जळगाव छत्रपती- संभाजीनगर महामार्गावर जय संघर्ष वाहण चालक मालक संघटनेच्या वतीने दुपारी एक वाजे च्या दरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात आंदोलकांनी चालक विरोधी कायदा रद्द करा.व चालक स्वरक्षण कायदा झाला पाहिजे.केंद्र शासन होशमे आवो होशमेंआवो अशा घोशना देण्यात आल्या हा रास्ता रोको अरधातास करण्यात आला होता आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन फर्दापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे.यांना दिले या आंदोलनामुळे जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वर काही काळ वाहने थांबल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या व वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती.
या आंदोलनात प्रविण वाघ,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष.राजेंद्र बडक सोयगाव तालुका अध्यक्ष .विष्णु आव्हाने. ता.सचिव.
उस्मान खा पठाण.माजी चेअरमन फकिरा पठाण.सुपडु नवाब जागीरदार एजाज शेख महमूद अहमद कादरी सपकाळ.फारुख पठाण.सतिष हसोले अरूण अंभोरे.अब्दुल शाह.विष्णु पवार.यांच्यासह शिवना.फर्दापूर.अजिंठा.सोयगाव.जरंडी.मादनी.गोंदेगाव.पहुर.या गावा चे वाहण चालक मोठ्या संखेने सहभागी झाले होते.