उपोषणाच्या 8 दिवशी मुख्याधिकारी यांनी सोडले उपोषण
चांदुर रेल्वे , प्रतिनिधी दिनेश जगताप, : चांदूर रेल्वे नगरपरिषद समोर सुरू असलेल्या स्वेच्छा सेवानिवृत्त वारसा हक्काने नोकरी मिळण्यासाठी मागिल 8 दिवसापासून आमरण उपोषण सुरू असून प्रशासन उपोषण कर्त्याचा अंत पाहत असल्याचे चित्र दिसत आहे. मुख्याधिकारी यांनी उपोषण कर्त्याच्या शिष्टमंडळात सोबत चर्चा करून न्यायालयाची स्थगिती उठविल्यानंतर उपोषणकर्त्यां अनिल वानखडे, कैलास वानखडे, लता इमले यांच्या वारसाचा प्रस्ताव सादर करून लवकरच त्यांना विशेष बाब म्हणून नियुक्ती दिली जाईल असे पत्र मुख्याधिकारी यांनी उपोषण मंडपात येऊन दिले.
उपोषणाकर्ता 4 जानेवारी पासून उपोषणाला बसले असुन आज 8 दिवस होत आहे पोटात अन्न नसल्याने यांची प्रकृती चिंताजनक होत झाली होती.
शासनाने लाड समिती शिफारशीनुसार सफाई कामगारांचा वारसा हक्काला नियुक्ती देण्याबाबत सर्व शासन निर्णय शासन परिपत्रके अधिक्रमीत करून दिनांक 24 /2/ 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. सदर शासन निर्णयामध्ये सफाई कामगारांच्या व्याख्येमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्ग तसेच कामगारांच्या व्याख्येत बसणारे सर्व कामगार यांचा उल्लेख असल्याने सदर शासन निर्णयानुसार आपला प्रस्ताव नगरपरिषद प्रशासन संचालकाकडे पाठवण्यातील असे मुख्याधिकारी यांनी सांगितले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग दि 7/8/2023 च्या पत्रानुसार वाल्मीकि मेहतर व भंगी जाती व्यतिरिक्त इतर जाती प्रवर्ग यातील सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नियुक्ती देण्यास स्थगिती दिली आहे.
वारसा हक्काने नियुक्ती बाबतचा प्रस्ताव 2018 पासून प्रलंबित असून सदर कर्मचाऱ्यांची नियुक्ती अस्थायी सफाई कामगार म्हणून दि 14 /12 /1998 रोजी झालेली आहे. विशेष बाब म्हणून सदर स्वेच्छा निवृत्ती कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती दिल्या संदर्भात नगरपरिषद प्रशासन संचालकाकडे पाठविण्यात येईल असे उपोषणकर्त्यांना सांगण्यात आले. यावेळी उपोषण मंडपामध्ये कोतवाल संघटनेचे अध्यक्ष उत्तमरावजी गवई, राष्ट्रीय महामंत्री जयसिंग कछवा, रवी कैरोसिया, विभागीय अध्यक्ष मानसिंग झांजोट, राज्य सचिव गणेश तांबोले, जिल्हाध्यक्ष अशोक सारवाण, जिल्हा सचिव किशोर धामणे, प्रमुख सल्लागार वीरसिंग अठवाल, माजी नगराध्यक्ष गणेश राय, निलेश सूर्यवंशी, माजी नगरसेवक बच्चू वानरे, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष हर्षल वाघ, माजी उपाध्यक्ष देवानंद खुणे, सुमेध सरदार, प्रदीप गवई, नानासाहेब डोंगरे उपस्थित होते.