खामगाव:- दि. १२ डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या UGC NET (University GrantsCommission National Eligibility Test) ही परिक्षा विद्यापीठ अनुदान आयोग, राष्ट्रीय पात्रता परिक्षा असून ही देशातील सर्वात मोठ्या परिक्षां पैकी एक परिक्षा आहे. Assistant Professor या पदासाठी घेण्यात येते.
या परिक्षेचा निकाल दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी जाहीर करण्यात आला. या परिक्षेत गो.से.महाविद्यालयातील विद्यार्थी व कॉलेज ऑफ मॅनेजमेंट चा माजी विद्यार्थी प्रदिप गोपाल वानखडे रा-हिंगणा (कारेगाव) ता.खामगाव, जि. बुलडाणा हे मराठी (०३८) या विषयात गुणवत्ता सिद्ध करून पात्र ठरले आहे. त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या आई वडीलांना व
शिक्षकांना दिले जात आहे. त्यांच्या या यशा- बदद्ल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.