धामणगाव रेल्वे : सुरज वानखडे
अनुगामी लोकराज्य महाभियान- अनुलोम ची धामणगाव रेल्वे येथे वस्ती मित्र रवि हरीश्वर मलवार यांच्या घरी अयोध्या मंदिर लोकार्पण शुभप्रसंगी प्रखर रामभक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैयक्तिक आस्थेतून आणि राम जन्मभूमी संघर्ष मुक्तीतील सहभागाची आठवण म्हणून वस्ती मित्रांना प्रभू श्रीरामाची पंचधातू मिश्रित मूर्ती देव्हाऱ्यात पूजेसाठी प्रदान करण्यात आली. अनुलोम प्रतिनिधी प्रज्वल घाटोळ भागजनसेवक आणि भूषण धुवे भाग समन्वयक, अनुलोम संस्था यांनी श्रीराम मूर्ती प्रदान केली.
यावेळी मलवार परिवाराने गावातील सर्व समाजातील प्रतिष्ठित नागरिक, महिला व तरुणांच्या उपस्थितीत स्वागत केले आणि घरी महाआरती केली आणि प्रभु श्री रामजीच्या मूर्तीचे सर्व समाजातील नागरिकांनी दर्शन घ्यावे असे आवाहन केले. यावेळी हरीश्वर मलवार, अमित मलवार, गजानन मलवार, कृष्णाजी पड़ोळकर, अशोक कुंजेकार, राजेशजी पुरोहित, शिवकुमारजी कोठारी, संतोष सिंह, विशालजी मोकासे, अतुल भोगे, सचिन भेंडे, आशीष शिंदे,अथर्व शेंडे, अनिरुद्ध देशमुख, अनिकेत तायडे, मयुर राठी, प्रसन्न भोगे, मोहन कांबळे, गोकुलसिंह ठाकुर तसेच लायंस क्लब धामणगांव दाता चे सर्व सदस्य, हनुमान चालीसा सामूहिक उपासना मंडळाचे सर्व सदस्य, मणिकर्णीका महिला ग्रुप च्या सर्व महिला सभासद तसेच इतर रामभक्त उपस्थित होते..