प्रतिनिधी - सुरज वानखडे
दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी होत असलेल्या अमरावती जिल्ह्यामधील बहुचर्चित असलेले तिवसा तालुक्यातील कुऱ्हा येथील शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालय कुऱ्हा मार्फत होणाऱ्या 'कुऱ्हा महोत्सव' या कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्यातीलच प्रसिध्द संघटित युवा पत्रकार संघ धामणगाव रेल्वे च्या पदाधिकार्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून तसेच शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालयाला भेट दिली.
दि. १९ जानेवारी ते दि. २२ जानेवारी पर्यंत आयोजन करण्यात आले. या कुऱ्हा महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली. त्यामध्ये ग्रंथ दिंडी, कार्यक्रमाचे उद्घाटन, सत्कार कार्यक्रम, आरोग्य शिबिर, बॉडी बिल्डिंग स्पर्धा, रस्सी खेच स्पर्धा, डिश डेकोरेशन स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, निबंध स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शनी, सांस्कृतिक कार्यक्रम, महिला मेळावा, संमेलन, एकता मॅरेथॉन, कराओके स्पर्धा, व्याख्यान, बक्षीस वितरण समारोप प्रकारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालय ला भेट दिली असता,
वाचनालयाचे अध्यक्ष विवेक बिंड यांच्याशी संघटित युवा पत्रकार संघ धामणगाव रेल्वे च्या सर्व पदाधिकाऱ्यांशी वृत्तपत्र, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी वर्ग, वाचक वर्ग, आपल्या वाचनालया मधे अभ्यास करत घडलेल्या विद्यार्थी वर्गा विषयी तसेच शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालय तर्फे दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या कुऱ्हा महोत्सव कार्यक्रमाची संकल्पना त्यांच्या डोक्यात कशी आली हे सांगत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
ते सांगत होते की आपल्या गावातील म्हणजेच कुऱ्हा गावातील युवक व युवतीं तसेच महिला मंडळी यांच्यातील लपलेल्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालय यांच्या प्रयत्नातून निर्माण झालेले व्यासपीठ म्हणजेच कुऱ्हा महोत्सव होय. असे सांगत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाला संघटित युवा पत्रकार संघ धामणगाव रेल्वेचे अध्यक्ष संजय सायरे, महासचिव सचिन ठाकूर, कोषाध्यक्ष सूरज वानखडे, तसेच सदस्य, हितेश गोरिया, शशांक चौधरी व शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालय कुऱ्हा चे अध्यक्ष माननीय विवेक बिंड, सचिव अमोल भागवत, ग्रंथपाल दीपक पोकळे व अभिजित बाखडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
गावातील युवकांना व युवतींना तसेच गावातील महीला वर्गाला त्यांच्यातील लपलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी वाचनालया तर्फे एक निर्माण केलेले व्यासपीठ म्हणजे कुऱ्हा महोत्सव - विवेक बिंड, (अध्यक्ष शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालय, कुऱ्हा )