अकोला - स्थानिक न्यू तापडिया नगरमधील अंतरंग पब्लिक स्कूलचा वार्षिक स्नेहमिलन मेळावा विद्यार्थ्यांच्या विविध कला कौशल्याच्या सादरीकरण कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी ईगल ईन्फ्रा प्रा.लि.चे सर्वेसर्वा इंजि. रामप्रसादजी मिश्रा,अकोला अर्बन बॕंकेचे माजी अध्यक्ष इंजि.बाबासाहेबजी पाठक,माजी नगरसेविका गितांजली शेगोकार, माजी नगरसेवक अॕड.गिरीशजी गोखले,सामाजिक कार्यकर्ते निलेशजी देव हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून, तर पब्लिक स्कूलचे संस्थापक- अध्यक्ष इंजि. प्रशांत जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थी व बालकलाकारांनी गायन,नाटक,सदाबहार गीते व अनेक कला कौशल्यांसह विविध गाण्यांवर बहारदार नृत्याचे सादरीकरण केले.याबध्दल सर्व मान्यवरांनी विद्यार्थांचे कौतुक केले.याप्रसंगी रामप्रसाद मिश्रा यांनी पालकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्राधान्य देण्याची गरज व्यक्त करून शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले.सुशिक्षित असण्याबरोबरच सुसंस्कारीत विद्यार्थ्यांची समाजाला खरी गरज असून त्या दिशेने अंतरंग पब्लिक स्कूलची कौतुकास्पद वाटचाल सुरू असल्याचे सांगून शैक्षणिक प्रगतीला बाबासाहेब पाठक यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.यासाठी शिक्षक कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.कार्यक्रमाचे शेवटी संस्थापक- अध्यक्ष इंजि. प्रशांत जोशी यांनी आभार व्यक्त केले तर स्कूलच्या संचालिका जयश्री प्र.जोशी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शिक्षक कर्मचाऱ्यांना प्रगतीचे श्रेय देऊन आभार व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे संचलन आकांक्षा जोशी व गायत्री मिरजामले यांनी केले.