बांधकामात एकेरी विटांच्या भिंती - नित्कृष्ठ दर्जाचे बांधकाम होत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप
धामणगाव रेल्वे - सुरज वानखडे
अमरावती , धामणगाव रेल्वे : विरूळमार्गे अमरावती रस्त्यावरील एकमेव ठिकाण गंगाजळी येथील प्रवासी निवारा बांधकाम नसल्याने एक वर्षाअगोदर गावातील नागरिकांनी प्रवासी निवाऱ्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले होते, त्या आंदोलनाला यश प्राप्त होऊन गंगाजळी या गावाकरिता आमदार निधीतून ३ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले होते. सदरच्या प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम सद्यस्थित सुरु आहे. त्यात अक्षरशः एकेरी विटांच्या भीतीचा वापर होत असून वापरण्यात येणारे मटेरियल सुद्धा इस्टिमेट नुसार होत नसल्याने गावकऱ्यांमध्ये बांधकामाबाबत कमालीची नाराजी व्यक्त करण्यात आहे. या संदर्भात ठेकेदार तसेच संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ३ लाखांचाच निधी असल्याने त्यानुसार इस्टिमेंट तयार करण्यात आले असून त्यामध्ये हाल्फ ब्रिक चाच उल्लेख करण्यात आला आहे त्यामुळे इस्टिमेटनुसार बांधकाम सुरु असल्याचे म्हणणे अधिकाऱ्यांचे आले.
एकीकडे शासन घरकुल योजना राबवित असून त्यामध्ये दोन रूम, सोबत संडास, बाथरूम बांधल्यावरच लाभार्थ्यांच्या खात्यात १ लक्ष २० हजार रुपये देण्यात येते आणि दुसरीकडे प्रवाशी निवाऱ्यासाठी ३ लक्ष रुपयाचा निधी असतानाही जर तो बांधकामासाठी अपुरा पडत असल्याचे उघडकीस येत आहे. गंगाजळी येथील प्रवाशी निवाऱ्याचे बांधकाम एकेरी विटांनी सुरु असून त्यात प्रमाणाच्या बाहेर डस्ट चा वापर होत असल्याने बांधकाम जास्त काळ टिकणार नसल्याचे अनेकांचे मत आहे.. तर आमदार निधीतून मिळालेला निधी हा बांधकामासाठी खर्च होत नसून संबंधितांच्या घशात जात असल्याचे सुद्धा बोलल्या जात आहे, त्यामुळे आमदारांनी सदरच्या विषयाकडे लक्ष घालण्याची गरज असल्याची नागरिकांमधें चर्चा सुरु आहे.