स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा

 




           श्रीनिवासा रामानुजन यांच्या जन्मदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन


          प्रतिनिधी - सुरज वानखडे


  श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शैक्षणिक संस्था द्वारा संचालित स्कुल ऑफ स्कॉलर्स येथे श्रीनिवासा रामानुजन यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या प्राचार्या के साई नीरजा आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गणित शिक्षक महेश गंगन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेच्या प्राचार्या साई नीरजा यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करून महत्त्वाची माहिती दिली. 

यावेळी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षक गौरव देवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनिवास रामानुजन यांच्यावरील एक सुरेख गणित गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीचा विद्यार्थी पुष्पक राठोड याने केले तर इयत्ता आठवीचा विद्यार्थी पार्थ पनपलिया याने आभार मानले. इयत्ता पाचवीचा विद्यार्थी स्मीत गोटे व इयत्ता आठवीचा विद्यार्थी नैतिक निस्ताने यांनी महत्त्वाची माहिती दिली.गणित दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्व गणित शिक्षकांचा ग्रीटिंग कार्ड देऊन गौरव करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महेश गंगन यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना गणित विषयासंदर्भात महत्वाची माहिती दिली.या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्या के साई नीरजा, आयोजन समिती आणि ग्रीन हाउस सदस्यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post