प्रतिनिधी - सुरज वानखडे
नेवासा तालुक्यातील गोदावरी नदीकाठी क्षेत्र टोका येथे सिद्धेश्वर मंदिराचे महंत बालब्रह्मचारी महाराज यांचा द्वितीय पुण्यतिथी सोहळा आयोजित
करण्यात आला होता. यावेळी क्षेत्र अंबिकापूर - कौंडण्यपूर येथील रुक्मिणी पीठाधीश्वर, श्रीमद जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी राजेश्वर माऊली सरकार यांची प्रमुख उपस्थिती होती.श्रीमद् जगद्गुरू माऊली सरकार यांचे उपस्थीतीत सिध्देश्वर मंदिराचे मठाधिपती पदावर बालयोगी परमहंस महेश्वरानंद महाराज यांना विराजमान करण्यात आले . या कार्यक्रमात परमहंस कृष्णानंद कालिदास, प.पू. शंकराचार्य अभिनवविद्यानृसिंह भारती, प.पू. जगद्गुरू सूर्याचार्य कृष्णदेवानंदगिरी महाराज, कालीचरण महाराज, महंत सुनीलगिरी महाराज यांची उपस्थिती होती.