मणिद्वीप फाउंडेशन कडून वृद्धाश्रमात आरोग्य तपासणी सह जीवनावश्यक वस्तू वाटप

 



प्रतिनिधी - सुरज वानखडे 

 वृद्धाश्रमातील व्यक्तीविषयी एक आपुलकीची भावना मनात ठेवून मणिद्वीप फाउंडेशन कडून १८ डिसेंबर २०२३ रोजी गुर्जर पुनर्जन्म वृद्धआश्रम बुटीबोरी येथे त्यांच्या आरोग्य तपासणी सह जीवनावश्यक वस्तूचा वाटप करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण वृद्धाश्रमातील संपूर्ण व्यक्तींची आरोग्य तपासणी, योगासन, ध्यान आणि सर्वांच्या मनोरंजनसाठी वॉलीबॉल आणि चंगा आष्टा चे बोर्ड वितरित करण्यात आले. तसेच सर्वाना जपमाला देण्यात आली असून भैयाजी गुर्जर पुनर्जन्म वृद्धआश्रम चे संस्थापक प्रयाग सर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.



यामध्ये मणिदीप फाउंडेशन च्या रिशा पाराशर, शिपिं सिंह, डॉक्टर उत्कर्ष मॉल, निकांत धारे, भूषण कांडलकर, डॉ सिद्धि श्रृंगी, शिशु वर्मा, विजय यादव यांचे सहकार्य लाभले असून संपूर्ण दिवस त्यांनी वृद्धाश्रमातील नागरिकांच्या सेवेत दिला असून प्रत्येक व्यक्तीशी भावनिक साद घालत विचारपूस केली.




Post a Comment

Previous Post Next Post