विदर्भ संपादक मिलिंद जामनिक
मूर्तिजापूर - समाजाचा एक घटक म्हणून समाजाप्रती असलेले प्रेम किंवा समाजाला आपलं काही देणं लागतं या उदात्त हेतूने बौद्ध धर्माचे धम्म प्रचारक तथा धम्म गुरुची भुमिका बजावत असणारे भिक्कु यांना निःशुल्क वैद्यकीय सेवा देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली.
गत एक ते दीड वर्षापासून मूर्तिजापूरात आपली खाजगी वैद्यकीय सेवा देत आहेत अशातच समाजाचा एक घटक म्हणून समाजाला आपलं काही देणं लागतं या उदात्त हेतूने परिसरात असलेल्या बौद्ध विहारावर वास्तव्यास असलेले भिक्कु यांना आपली दैनदिन दिनचर्या चालविण्यासाठी ज्या ठिकाणी राहत आहेत त्याठिकाणच्या नागरिकांच्या घरोघरी जाऊन भिक्षा ( दान ) मागून भोजन ग्रहण करावे लागते आणि पैश्याच्या रुपात दिलेले दान हे इतर उपयोगी आणावे लागते हि बाब डॉ. चक्रनारायण यांनी लक्षात घेऊन तपासणीसाठी येणाऱ्या भिक्कु गणांना निःशुल्क वैद्यकीय सेवेसह आपल्याकडे उपलब्ध असलेली औषधी देऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न करत आहेत. याच बरोबर येणारा प्रत्येक जण परिस्थीतीने श्रीमंत असेलच असे नाही यासाठी गरीब परिस्थितीला रुग्ण तपासणीसाठी आला तर त्याचे कडे पैसे नसले तरी त्या रुग्णावर उपचार केले जातात असे एका उपचार घेतलेल्या रूग्णांनी सांगितले आहे.