49 हजाराचा विदेशी मद्य जप्त
राज्य उत्पादन शुल्क, अमरावतीव्दारे हॉटेल सुर्या रेस्टॉरेंट ॲण्ड बार या एफएल-3 अनुज्ञप्तीधारकांची तपासणी दरम्यान विदेश मद्य व बियरचा विना परिवहन पासचा 49 हजार 765 किंमतीचा मद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच अनुज्ञप्तीधारकांवर विभागीय गुन्हा नोंदविण्यात आले, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक ऐ.एम. जुमडे यांनी दिली. राज्य उत्पादन शुल्क अमरावती विभागीय उपआयुक्त व अमरावती शहर क्रमांक 2 च्या अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. यावेळी राज्य उत्पादन शुल्कचे अधिक्षक ज्ञानेश्वरी अहेर, निरीक्षक अ.ओ. गभणे, सहायक दुय्यम निरीक्षक ए.एक.काळे, जवान जे.बी.चव्हाण, जी.एम. वाकोडे आदी उपस्थित होते.