अमरावती - येथील भीम टेकडी परिसरात राज्यस्तरीय दोन दिवसीय धम्म परिषद उत्साहात पार पडली.
दिनांक 25 व 26 नोव्हेंबरला भीम टेकडी परिसर अमरावती या ठिकाणी रुग्णसेवक सुरेश तायडे मित्रपरिवार बहुउद्देशीय संस्थेद्वारा दोन दिवसीय राज्यस्तरीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते 25 तारखेला सायंकाळी चार वाजता भदंत प्रज्ञा बोधि महाथेरो व भिक्खू संघाच्या वतीने धम्म परिषदेचे उद्घाटन करून हजारो नागरिकांना धम्मदेशना देण्यात आली 26 नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता भिक्खू संघाला भोजनदान देण्यात आले यावेळी अमरावती जिल्ह्यातील व राज्यातील अनेक उपासक उपासिकांनी धम्म परिषदेला उपस्थित राहून धम्मदेशना घेतली या धम्म परिषदेमध्ये 5000 उपासक-उपासिकांना भोजनदान देण्यात आले सायंकाळी चार वाजता नागपूर दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत नागार्जुन सुरेई ससाई यांचे आगमन भीम टेकडी या ठिकाणी झाले भंतेजींनी सर्वात प्रथम धम्मदेशना देऊन उपस्थित असलेल्या हजारो नागरिकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. सायंकाळी सात वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक रवी गवई यांच्या भीम बुद्ध गीताचा कार्यक्रम रात्री दहापर्यंत संपन्न झाला.
या कार्यक्रमाचा हजारो नागरिकांनी भोजनासह आस्वाद घेतला ज्या नागरिकांना बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची असेल त्यांचे फॉर्म रुग्णसेवक सुरेश तायडे यांच्या जनसंपर्क कार्यालयावर उपलब्ध आहेत.
या राज्यस्तरीय धम्म परिषदेला यशस्वी करण्यासाठी रुग्णसेवक सुरेश तायडे बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने सहकार्य केले व धम्मपरिषद यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो नागरिकांनी उपस्थिती होती.