बदलापूर(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-शहरातील सर्वागींण विकास व्हावा यासाठी कार्यतप्तर असणारी बदलापूर येथील सिटीझन्स वेल्फेअर असोशिएशन ही संस्था कार्यरत आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून सिटीझन्स वेल्फेअर असोशिएशन यांचेमार्फत सलग दुस-या वर्षी दीपावली निमित्त कोंडेश्वर येथील तारपाडी आदिवासी पाड्यावरील सर्व आदिवासी बांधवांसाठी कपडे व मिठाई वाटप २६नोव्हेंबर रोजी करण्यात आले. सिटीझन्सचे उपक्रमाचे हे द्वितीय वर्ष आहे.यावर्षीचा हा स्तुत्य उपक्रम सिटीझन्स वेल्फेअर असोशिएशनच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत आणि सहकार्याने पार पडला. यावेळी आबालवृद्ध नागरिकांच्या चेह-यावर आनंद फुलला होता.
यावेळी असोशिएशनचे जेष्ठ सल्लागार दिलिप नारकर,सदस्य दिलीप शिरसाट,चंद्रकांत चिले,सुवर्णा इस्वलकर,गुरुनाथ तिरपणकर,सुदर्शन सावंत,डाॅ.अमितकुमार गोविलकर हे उपस्थित होते.तसेच या उपक्रमासाठी महेश सावंत,सुहास सावंत, विलास साळगावकर,सचिव राजेंद्र नरसाळे,अध्यक्ष सुनिल दळवी आणि अनेक दानशूर मान्यवरांचा सहभाग लाभला.