Amaravatinews - अमरावती महानगरपालिकांचे अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संध्याकाळी अतिक्रमण विभागामार्फत अवैध बॅनर मोहीम रेल्वे स्टेशन ते इर्विन चौक , मालवीय चौक ते राजकमल चौक, राजकमल चौक ते राजापेठ परिसरातील बॅनर काढण्यात आले तसेच चौधरी चौक येथील दोन लोखंडी खोके लावून लोखंड विकणाऱ्याची दुकान तोडण्यात आली आणि संपूर्ण साहित्य जप्ती करण्यात आली व अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही करण्यात आली. या कार्यवाही दरम्यान दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. सदर कार्यवाहीत अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.