आमदार रवि राणा यांना दिले निवेदन..
अमरावती : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये लाखो गरजू आणि होतकरू विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत.
परंतु अजूनही पोलीस भरती आलेली नाही. पोलीस प्रशासनामध्ये सध्या खूप जास्त जागा रिक्त असूनही सरकार जाहिरात काढत नाही. म्हणून अमरावती जिल्ह्यातील 90 हजार विद्यार्थ्यांनकडून आमदार रवी राणा यांना निवेदन दिले.
की आपण आमचे लोकप्रतिनिधी तसेच ते हितचिंतक या नात्याने आमची मागणी सरकारपर्यंत पोहोचवावी. येणाऱ्या फेब्रुवारी महिन्याच्या आत पोलीस जाहिरात येऊन भरती प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे.
नाहीतर फक्त जाहिरात काढून पैसे गोळा करून जर आचारसंहिता लागली तर विद्यार्थ्यांच आयुष्य उध्वस्त होईल.