विकासाचा कार्यक्रम संयुक्तरित्या राबवून विदर्भ समृद्ध करा- नितिन गडकरी

 



मूर्तिजापुरात राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण ; कारंजा रस्त्याचे भूमिपूजन ; मान्यवरांची उपस्थिती..!



 


 मूर्तिजापूर - केवळ रस्ताच बांधला नाही,तर त्याच्या माध्यमातून जलसंवर्धनाची कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत, त्यामुळे शेतकरी समृद्ध होईल. उद्यापासून सुरू होणाऱ्या तीन दिवसांच्या कार्यशाळेतून पशूखाद्य, फलोत्पादन झिंगे उत्पादन, गोट फार्मच्या धर्तीवर काऊ फार्म, मत्स्य व्यवसायादी तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावे आणि लोकप्रतिनिधींनी त्यांना सहकार्य करावे, निश्चितपणे शेतकऱ्यांचा विकास होऊन विदर्भ सुखी, समृद्ध व संपन्न होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग 

 मंत्री नितिन गडकरी यांनी आज येथे व्यक्त केला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील अमरावती ते कुरणखेड चौपदरी रस्त्याच्या ९१२ कोटी रुपये खर्चाच्या ५४ किलोमिटर लांबीच्या रस्त्याचे, कुरणखेड ते शेळद रस्त्या (लांबी 50.00 कि.मी. किमत ₹ 872 कोटी) चे लोकार्पण व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ सी वरील कारंजा-खेर्डा-मूर्तिजापूर मुर्तिजापुर रस्त्या (लांबी 26.00 कि.मी. किंमत ₹594 कोटी) चे भूमीपूजन केल्यानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. खासदार भावना गवळी, खासदार अनिल बोंडे, आमदार हरीश पिंपळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार प्रताप अरसोड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दीपप्वजलनाने कार्यक्रम सुरू झाला. राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाचे आशीष असाटी यांनी प्रास्ताविक केले. 

          आमदार हरीश पिंपळे यांनी यावेळी बोलतांना २४०० कोटीची च्या कामांचे लोकार्पण व भूमीपूजन आपल्या मतदारसंघात करणाऱ्या नामदार गडकरीच्या ऋणातून मुक्त होताच येणार नाही, मात्र त्यांनी आता रेल्वेमंत्री व्हावे, आशी अपेक्षा व्यक्त केली. आमदार रणधीर सावरकर यांनी अकोल्यातील वाशीम बाय पास वर फ्लाय ओव्हवर, एमआयडीसीतील अप्पू पॉईंटजवळ अंडरपास द्यावा तसेच क्रॉपींग पॕटर्न मध्ये बदल करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवावे, अशी आपेक्षा नामदर गडकरींकडे व्यक्त केली. आमदार पाटणी, आमदार भारसाकळे, आमदर अरसड, खासदार बोंडे, खासदार गवळी यांची भाषणे झाली.

----------------------------------------------------

नितिन गडकरी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच स्व.आमदार गोवर्धन शर्मा व आजारी आसल्यामुळे येऊ न शकलृले खासदार संजय धोत्रे यांची आठवण काढून या रस्त्यासाठी त्यांनी सातत्याने मागणी केल्यचे नमुद केले.



----------------------------------------------------

कारंजा रस्त्यावरील खड्डे दाखवून लोकांनी चंद्रयानाचा उल्लेख करीत हे चंद्रावरील खड्डे आसल्याचे सांगून माझे १०० किलो वजन तसूभरही कमी होऊ दिले नसल्याचा आमदर हरीश पिंपळेंच्या भाषणातील उल्लेखाचा धागा पकडून नामदार गडकरींनी, आता हा रस्ता झाल्यानंतर ५० वर्षे त्यावर एकही खड्डा दिसणार नाही, त्यामुळे दिडशे किलो वजन होऊ देऊ नका व 'चंद्र वाढतो कलेकलेने हरीश वाढतो किलोकिलोने',असे म्हणण्याची पाळी आमच्यावर आणू नका, अशी मखलाशी करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. 

----------------------------------------------------

कोलकात्या पासून सुरू होऊन गुजरात पर्यंत जाणाऱ्या या ७ हजार कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे काम जवळपास पूर्णत्वास गेले असून आज दोन पॕकेजचे लोकार्पण झाले. १५ जानेवारी पर्यंत पूर्णतः पूर्णत्वास जाईल, असे नामदार गडकरी यांनी जाहीर केले.

---------------------------------------------------

शेगाव ते देवरी फाटा रस्त्यावरील पूर्णा नदीवरील पुलासाठी १०० कोटी रूपये, गांधीग्रामच्या पुलासाठी ७० कोटी मंजूर करण्याची घोषणा गडकरींनी यावेळी केली. अकोट ते अकोला रस्त्याचे काम ३-४ महिन्यात पूर्ण करण्याचेही त्यांनी जाहीर केले. 

----------------------------------------------------

वाईट काम करणाऱ्यांना शिक्षा, मात्र चांगले काम करणाऱ्यांचा सन्मान झालाच पाहिजे, असे सांगून गडकरींनी ईन्फ्रा व इगल कंपनीच्या अधिकाऱ्यांचा मंचावर बोलावून त्यांना प्रमाणपत्र दिले.

-------------------------------------------

 असा होणार कारंजा- खेर्डा - मूर्तिजापूर रस्ता


भूमिपूजन होत असलेल्या या चौपदरी रस्त्याचे सिमेंट कॉक्रिट दुभाजकासहित बांधकाम २६.०८ आहे. त्यात ८ लहान पूल, ३८ मो-या, १ पथकर वसुली नाका, रस्त्याच्या दोन्ही बाजूस सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम २५.२७६ किमी, संपूर्ण रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड व कुंपण, पथदिवे ३.३५८ किमी, १० प्रवासी निवारे आदींचे नियोजन आहे. हे काम २४ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे.

या चौपदरी रस्त्यामुळे समृद्धी महामार्ग, तसेच तीन राष्ट्रीय महामार्ग, अकोला, मूर्तिजापूर, कारंजा, दर्यापूर ही शहरे जोडली जातील. या प्रकल्पांतर्गत अमृत सरोवर योजना राबविण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे अकोला व वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे जाळे पूर्णत्वास जाणार आहे.

----------------------------------------

असा आहे अमरावती - कुरणखेड - महामार्ग


अमरावती ते कुरणखेड टप्प्यात २ मोठे पूल, ४८ कल्व्हर्ट, २ वाहन भुयारी मार्ग, ५ पादचारी भुयारी मार्ग, १० बस थांबे यांचा समावेश आहे. कुरणखेड ते शेळद टप्प्यात ४ मोठे पूल, ५६ कल्व्हर्ट, ११ वाहन भुयारी मार्ग, ४ पादचारी भुयारी मार्ग, १० बस थांबे यांचा समावेश आहे.

-----------------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post