घरफोडी करणारे आरोपीला अटक,1 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त,अमरावती गुन्हे शाखेच्या युनिट एकची कारवाई...

 


अमरावती : घरफोडी करून, चोरीतील पैसे मौजमजेस मौजमजेसाठी उडविणाऱ्या एका चोराला अमरावती गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1 च्या पथकाने गजाआड केले. सैय्यद कमर सैय्यद करीम 31 वर्षीय राहणार हैदरपुरा) असे आरोपीचे नाव असून, त्याच्या ताब्यातून 1 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, त्याला गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. 




ही कारवाई अमरावती .गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक मनीष वाकोडे, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे, राजूआपा बाहेनकर, फिरोज खान, सतीश देशमुख, दिनेश नांदे, विकास गुडदे, सुरज चव्हाण, निखिल गेडाम, निवृत्ती काकड, अमोल मनोहरे, अमोल बहादरपूरे, भूषण पद्मणे, किशोर खेंगरे यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post