मुंबई(प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर) दर्याचा राजा दिवाळी अंक व दीपस्तंभ दिवाळी अंक नामंकित कवी साहित्यिक अरुण म्हात्रे यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा रविवार दिनांक १२/नोव्हें./२३ रोजी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर येथे संपन्न झाला. निवृत्त पोलीस उपायुक्त,कवी रविकिरण पराडकर यांच्या उपस्थितीत व कवयित्री पूजा काळे यांच्या सुंदर सूत्र संचालनात कार्यक्रमाला रंगत आली प्रकाशन सोहळा व कवी संमेलन सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिसादात अनेक कवींनी आपल्या कविता गायन करत आई बाबत चा विठ्ठला पर्यंतचा भाव सादर केला तसेच कवितांच्या माध्यमातून कोळी बांधवांच्या समस्याही व्यक्त करत कोळी बांधवांच्या समस्या मांडण्याचे काम करण्यात आले. प्रकाशन सोहळ्या बरोबरच आयोजित कविसंमेलन ला अनेक कवींनी योगदान देत कवितांच्या भावार्थातून खूप काही बोधमय गोष्टी त्यांनी देत कवी संमेलनाचा आनंद उपस्थितांनी देण्याच कार्य केले. संमेलनाध्यक्ष कवी, साहित्यिक अरुण म्हात्रे आणि कवी निवृत्त पोलीस उपायुक्त रविकिरण पराडकर, कवयित्री पूजा काळे यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली. कार्यकारी संपादक दर्याचा राजा जनार्दन पाटील, संपादक पंढरीनाथ तामोरे पत्रकार श्रीकांत आंब्रे, मकरंद वांगणेकर, मोरेश्वर बागडे, शिवाजी गावडे, कमलाकर राऊत, वसंत तांडेल, अविनाश तांडेल, रोहिदास तरे,अशोक भिंगार्डे, रविकिरण पराडकर,
खंडू माळवे या कवींनी सहभाग घेतला,पूजा काळे यांनी सूत्रसंचालन करत पंढरीच्या विठ्ठला पर्यंत मनोमनी घेऊन जात सोहळ्याला रंगत आणली सदर सोहळ्याला महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पाटकर, सचिव सुनील शिर्के, खजिनदार अनिल पंडित, गुरुनाथ तिरपणकर(पत्रकार), शशिकांत सावंत (पत्रलेखक), संघाचे आधारस्तंभ आप्पा तोडणकर यासह अनेक सदस्यांनी उपस्थिती दर्शवत प्रकाशन सोहळा व कवी संमेलनाला सहयोग दिला दर्याचा राजा चे संपादक पंढरीनाथ तामोरे व महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पाटकर यांच्या मार्गदर्शनात सोहळा संपन्न झाला पंढरीनाथ तामोरे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.