चोहोट्टा बाजार प्रतिनिधी : अमोल राणे
आश्विन-कार्तिक महिना सुरु झाला की, थंडीची चाहूल लागतेच. पण त्यासोबत गावोगावी ऐकू येतात काकड आरतीचे सूर. काही गावांमध्ये आश्विन पौर्णिमेपासून पासून तर काही ठिकाणी कार्तिक महिन्यांमध्ये काकड आरती होते. काही मंदिरांमध्ये रोज पहाटे काकड आरती केली जाते. शुक्रवारी स्व. सुरेश पेठे गुरुजी यांच्या घरी सेवा झाल्यानंतर शनिवार आजची सेवा अमोल रामेश्वर राणे यांच्या घरी पार पडली या मध्ये फराळ चहा व दिंडी प्रमुखांचा नारळ दुपट्टा टोपी देऊन सत्कार करण्यात आला.
करतवाडी रेल्वे येथे काकडा आरती दरवर्षी काढण्यासाठी माझी पोलीस पाटील अशोकराव किरडे ज्येष्ठ नागरिक दादारावजी सनगाळे हे काकडा आरतीची परंपरा अखंडितपणे कायम ठेवत आहेत,तसेच जनार्दनजी किरडे हे मुरलीधर किरडे,रामेश्वर राणे, गोकुळ पेटे राधाकिसन पेठे, अजाबराव किरडे मारुती किरडे, उमेश पेठे, सुनील जाधव देवकिशन पेठे, कृष्ण महाराज पेठे, गोलू टाकसाळे, मंगेश सनगाळे, ओम भालेराव ओम किरडे ओम पेटे, वेदांत खोडके गौरव पेठे , साहिल डोंगरे अजय पेठे गौरव किरडे बाल कीर्तनकार ह भ प विठ्ठल महाराज किरडे,प्रेम महाराज गाडे यांचा सहभाग असतो