(खडक्याचे पंजाबराव खडकेकर, कलगावचे पंजाबराव भवानकर आणी उटीचे पंजाबराव गावंडे हे त्रिमुर्ती चांगलेच नावाजले)
श्रीकांत राऊत यवतमाळ
महागाव तालुक्याच्या राजकारणात 'पंजाबरावांचा ' दबदबा आहे. खडक्याचे पंजाबराव खडकेकर, कलगावचे पंजाबराव भवानकर आणी उटीचे पंजाबराव गावंडे हे त्रिमुर्ती चांगलेच नावाजले आहेत. आता यात पंजाबराव सरदार या नावाची भर पडली आहे. पंजाबराव सरदार यांनी कलगाव ग्रामपंचायत मधे लोकप्रतिनिधित्व केले आहे. आज त्यांची सर्वानुमते महागाव तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत अविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीत अनु जाती-जमाती मतदार संघातून त्यांच्या नावावर एकमत करून त्यांना सभागृहात पाठविण्यात आले. पंजाबराव सरदार यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र कावळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक वाको डॉ.नरेंद्र भवरे, काँग्रेस अनुसूचित ट्रांसप जाती विभागाचे तालुकाध्यक्ष विनोद आहे. भगत, महागाव बाजार समितीचे वीज माजी सभापती भारत कांबळे, वसंतराव भिसे, अशोकराव आळणे, दिलीप कांबळे, खरेदी विक्री संघाचे माजी संचालक संजय डोंगरे, न.प. चे बांधकाम सभापती गजानन साबळे, माजी नगरसेवक नारायण शिरबिरे, सुहास भवरे, साहित्यिक रामराव कांबळे, विजय लहाने, देवराव हरणे, विजयकुमार कांबळे, प्रल्हाद नवसागरे, गणेश पाईकराव, माणिकराव खाडे, रमेश सांगडे, दलीतानंद खडसे, अमोल राजनकर, माणिक मुनेश्वर, धम्मानंद कावळे, अमोल राजवाडे, रवि वाघमारे, ललीतकुमार कावळे यांनी प्रयत्न केले.