लोकनेते कै गणपतराव तपासे यांच्या ११५वी जयंती सोहळ्याचे धारावीत आयोजन!

 





प्रतिनिधि- दत्ता खंदारे:    वीरशैव संत कक्कया ढोर समाजातील थोर व आदर्श लोकनेते, जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, माजी मंत्री तसेच विविध राज्याचे राज्यपाल म्हणून लौकिक मिळविलेले कै. ना. गणपतराव देवजी तपासे यांची ११५वी जयंती सोहळा धारावीतील एन शिवराज उद्यानात शनिवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.

 यावेळी प्रमुख पाहुणे म्हूणन जयंत पाटील (आमदार, माजी मंत्री )खासदार राहुलजी शेवाळे (लोकसभा गटनेता, शिवसेना ), आमदार वर्षा गायकवाड (आमदार धारावी विधानसभा ), आमदार ज्ञानराज चौगुले, माजी आमदार धर्माजी सोनकवडे, माजी आमदार सुभाष साबणे, महेश तपासे (मुख्य प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस )आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सदर जयंती सोहळ्याचे आयोजन संत कक्कया विकास संस्था धारावी यांनी केले असून या जयंती सोहळ्यास संत कक्कया समाज बांधवानी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे जयंती सोहळ्याचे प्रमुख संत कक्कया विकास संस्थेने आवाहन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post