युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकार द्वारा आयोजित आजादी का अमृत महोत्सव ते अमृत कलश या उपक्रमा अंतर्गत मेरी माटी मेरा देश, माटी को नमन वीरो को वंदन, या राष्ट्रीय मोहिमेकरिता चांदूर या गावातील अमोल भटकर यांची दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमाकरिता अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार सरांनी व जिल्हा युवा अधिकारी महेश शेखावत सर यांनी निवड केली असून
प्रशासनाच्या आव्हाना नुसार विविध उपक्रम आयोजित करण्यात आला होते. जिल्ह्यातील ग्राम स्थरावर मेरी माटी मेरा देश उपक्रम चांदूर गावामध्ये अमोल भटकर यांनी आयोजित केला होता
तसेच देशाची राजधानी दिल्ली येथे अमृत वाटिका तयार करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून ७ हजार ५०० कलशांमधून माती घेऊन अमृत कलश यात्रा
काढण्यात येणार असून ही अमृत वाटिका निर्माण करुन शाहिद विरांना नमन करणार आहे व पंचप्राण शपथ घेऊन या कार्यक्रमाची सांगता दिल्ली येथे राजपथावर होणार आहे.
त्या अगोदर दि. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी महाराष्ट्रची राजधानी मुंबई येथील क्रांती मैदान येथे कलश घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि मान्यवाराच उपस्थितीमध्ये भव्य कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यानंतर विशेष रेल्वे गाडी दि. ३१ ऑक्टोबर २०२३ ला राष्ट्रीय एकता दिवसाला अंतिम सोहळ्याचे आयोजन दिल्ली येथे करण्यात आलेले आहे. या अंतिम सोहळ्यात प्रधानमंत्री यांच्या उपस्थितीत मध्ये होणार आहे संपूर्ण अकोला जिल्हाचे प्रतिनिधित्व अमोल भटकर करणार आहेत.